...म्हणून 'ते' क्षेपणास्त्र पाकिस्तानात गेलं; राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती

...म्हणून 'ते' क्षेपणास्त्र पाकिस्तानात गेलं; राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती

दिल्ली | Delhi

काही दिवसांपूर्वी एक भारतीय क्षेपणास्त्र (Indian missile) पाकिस्तानात (Pakisthan) जाऊन धडकलं. यावरुन पाकिस्तानात खळबळ माजली होती. भारताने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचं (Pakistan Air Space) उल्लंघन केलं असा आरोप केला. याबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या घटनेची माहिती संसदेत दिली.

या घटनेबद्दल राजनाथ सिंह यांनी खेद व्यक्त करत म्हटलं की, '९ मार्च २०२२ ला ही घटना घडली होती. इन्स्ट्रक्शन्स सुरू असताना अनावधानाने चुकून क्षेपणास्त्र सुटले. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि सूचना सुरू असताना संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अपघाताने क्षेपणास्त्र सुटले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याची माहिती नंतर मिळाली. ही घटना खेदजनक आहे. या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे,' असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

तसेच, 'आम्ही आमच्या शस्त्र यंत्रणेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. या संदर्भात काही कमतरता आढळून आल्यास ती त्वरित दुरुस्त करण्यात येईल. आमची क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे. मात्र, पाकिस्तान या प्रकरणी कांगावा करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पाकिस्तान तोंडावरही आपटला आहे,' असा टोलाही राजनाथ सिंहांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com