Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याऐन हिवाळ्यात थंडी गायब

ऐन हिवाळ्यात थंडी गायब

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ऐन हिवाळ्यात ( Winter Season)गायब झालेल्या थंडीमुळे ( Cold)नाशिकचा पारा 30.1 अंश सेल्सिअसवर गेला आहे.किमान तापमानही 14.9 अंशावर पोहोचले आहे.सलग तीन दिवस वाढलेल्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे.

- Advertisement -

यंदा मुंबई शहरातही डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा 2-3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 1987 मध्ये 38 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते.

दक्षिण अंदमानात चक्रीय वार्‍यांची शक्यता असल्याने व त्यातून तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्राचें स्वरूप व त्याची मार्गस्थ वळणदिशा यावर नाताळातील थंडीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. कमी दाब क्षेत्राचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. 21 डिसेंंबर नंतर महाराष्ट्रात थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आजपासून तापमानात घट शक्य

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणार्‍या थंडीपैकी सुरवातीच्या 15 दिवसातील थंडी मॅडोैंस चक्री वादळाने हिरावून घेतली.मात्र,आता मंगळवार दि.20 पासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून 10 अंश सेल्सिअसपर्यन्त तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होवून 29 अंशापर्यन्त स्थिरावू शकते असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

पावसाची शक्यता नाही

दि.20 ते 31 डिसेंबर काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यताही जाणवत नाही. महाराष्ट्रासारखाच वरील प्रकारच्या थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातेतील (द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाड पर्यंतच्या) 20 जिल्ह्यात व दक्षिण मध्यप्रदेशातील (झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुल पर्यंतच्या)20 जिल्ह्यात जाणवू शकतो, असेही खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या