तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढेल - आरोग्यमंत्री राजेश टोपे

सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अटळ
तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढेल - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आगामी सण उत्सवाचे दिवस (Upcoming festive days )लक्षात घेता केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान करोनाची तिसरी लाट अटळ आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची ( Oxygen ) गरज भासेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली( Health Minister Rajesh Tope ). ज्या दिवशी ऑक्सिजनची मागणी वाढेल त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर भाष्य केले. केरळमध्ये ओणम सणानंतर एका दिवसात ३५ हजार रुग्ण सापडले होते. त्यामुळे त्यांनी दररोजच्या चाचण्यांची संख्या ३५ हजारावरून १ लाख ७५ हजार इतकी वाढवली आहे. राज्यात आता दहिहंडी, गणपती, पोळा असे सण आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असे टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अत्युच्च शिखरावर होता तेव्हा दरोज १ हजार ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. आता ऑक्सिजनची क्षमता दोन हजार मेट्रिक टनची आहे. पण तिसऱ्या लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची लागेल, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला.

५ सप्टेंबरपर्यंत शिक्षकाचे लसीकरण

राज्यातील शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून श शिक्षकांचे ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्हाधिका-यांना केल्या आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वीचे पहिले पाऊल आहे, असे टोपे म्हणाले. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण वाढवण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारकडून १ कोटी ७० लाख लसींचा पुरवठा होईल. लसीकरणात सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या मात्रेला प्राधान्य दिले आहे. दररोज सरासरी पाच लाख लसी दिल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com