जिल्ह्यात 13 दिवसांत प्रतिदिन सव्वादोनशे रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात 13 दिवसांत प्रतिदिन सव्वादोनशे रुग्ण करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) गेल्या 13 दिवसांत 2107 एवढे रुग्ण करोनाबधित (Covid Positive) झाले असून 2876 रुग्ण करोनातून (Corona) बरे झाले आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरत असून जिल्ह्यातील स्थिती दिलासादायक असल्याचे चित्र आहे. तरी देखील आरोग्य विभागातर्फे गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे...

करोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या (First Wave) तुलनेत दुसरी लाट (Second Wave) मोठी होती. दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात दररोज सरासरी 2 ते 3 हजार बाधित आढळून येत होते.

उपचार घेणार्‍यांची संख्या 48 हजारांवर जाऊन पोहचली होती. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य व पोलीस यंत्रणेने केलेले नियोजन आणि नागरिकांनी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया यामुळे आता जिल्ह्यात कुठेतरी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होत आहे. नाशिक शहर मनपा क्षेत्र (Nashik NMC), नाशिक ग्रामीण (Nashik Rural) आणि मालेगाव क्षेत्र (Malegoan) या ठिकाणी बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे.

त्यामुळे शहरात लॉकडाऊनच्या (Lockdown) निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या तेरा दिवसांची आकडेवारी बघितल्यास 2107 रुग्ण बाधित आहेत तर 2876 रुग्ण बरे झालेले आहेत. सध्या जिल्ह्यात 1612 एवढे रुग्ण उपचार घेत आहे. पूर्णपणे बरे झालेल्यांची टक्केवारी 97.46 एवढी आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेतून बाहेर येत असलो तरी तज्ज्ञांनी दिलेल्या निर्देशानुसार तिसर्‍या लाटेचा धोका कायम असल्याने नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

आज फक्त दुसरा डोस

शहरात आज होणारे लसीकरण हे फक्त दुसर्‍या डोससाठीच असणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील 29 केंद्रांवर हे लसीकरण होत असून यासाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहनदेखील महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. आज शहरातील 29 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू असणार आहे. तसेच नाशिक शहरातील ज्या नागरिकांचा कोविशील्ड (Covishield) या लसीचा दुसरा डोस बाकी असेल त्यांचेच लसीकरण (Vaccination) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com