जळगावात पाईपलाईन फुटली; लाखाे लिटर पाण्याची नासाडी
मुख्य बातम्या

जळगावात पाईपलाईन फुटली; लाखाे लिटर पाण्याची नासाडी

फुटलेल्या पाईपलाईनमधील कारंजा बघण्यासाठी गर्दी

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेकठिकाणी दमदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अनेक लहान-मोठी धरणांची पाणी पातळी वाढू लागली असून अनेक धरणे ओव्हरफ्लो होऊन ओसंडू लागली आहेत. त्यातच काल दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते.

आज सकाळपासून पावसाची उघडीप असताना अचानक हनुमान मंदिर परिसरात कमल हॉस्पिटल समोर जमीनीतून पाणीवर येऊन कारंजा उडू लागल्या जणू काही जमीनीला पाझर फुटला की काय? असा भास रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना होऊ लागला. मात्र हे पाणी जमीनीतून नाही तर मनापाच्या पाईपलाईनमधून (फुटून) वर आले व धो..धो.. वाहू लागल्याने पाण्याची नासाडी झाली. हे दृश्य बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

Deshdoot
www.deshdoot.com