जळगावच्या दूध संघाच्या निवडणूकीत अशा रंगतील लढती

jalgaon-digital
5 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) निवडणुकीतून (election) 76 जणांनी माघार (people withdrew) घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात (election arena) 40 उमेदवार (40 candidates) कायम आहे. या निवडणुकीत भाजप शिंदे गट प्रणित शेतकरी विकास (Farmer development led by BJP Shinde group) आणि महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल (Mahavikas Aghadi Pranit Cooperative Panel) यांच्यात सरळ लढत होणार असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

या मुली कोणा ‘आफताब’च्या जाळ्यात तर नाही ?

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी दि. 10 रोजी मतदार होणार आहे. आज माघारीची अंतीम मुदत होती. माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणुकीच्या रिंगणातून 76 जणांनी माघार घेतली आहे. तर 40 उमेदवार हे रिंगणात आहे. अंतीम 40 उमेदवारांची यादी जिल्हा निवडणुक अधिकारी संतोष बिडवाई यांनी आज जाहीर केली.

माघारीसाठी अनेकांची धावपळ

जिल्हा दूध संघाच्या निवडणुक माघारीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतीम मुदत होती. त्यामुळे विविध मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अनेकांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र दिसून आले.

नेत्यांमध्ये गुप्तगू

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी दूध संघात ठाण मांडून होते. भाजपचे आ.मंगेश चव्हाण शिंदे गटाचे आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील या नेत्यांमध्ये बराच वेळ माघारीवरुन चर्चा सुरु होती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, मा.खा.वसंतराव मोरे, वाल्मिक पाटील, इंदिराताई पाटील, छायाताई देवकर यांच्यामध्येही गुप्तगू सुरु होती.

मतदारांची पळवा-पळवी होणार

जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणुक ही अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. महाविकास आघाडीविरुध्द भाजपा आणि शिंदे गट यांच्यात ही राजकीय लढाई होणार आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्हा दूध संघावर यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे दूध संघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांनीही दंड थोपटले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांची पळवापळवी होणार असल्याची दाट शक्यता आहे.

सकारात्मक विचार केल्याने दूर होतो ताणतणाव!VISUAL STORY : आयुष्यभर या ‘दिवंगत’ अभिनेत्याने शिकवली नात्यांना जपण्याची कला

मुक्ताईनगरात प्रतिष्ठेचा सामना

मुक्ताईनगर तालुका मतदार संघात भाजपचे आ. मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या पत्नी तथा विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्यातील सामना रंगणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खडसे आणि आ.चव्हाणांमध्ये दूध संघाच्या विषयावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तसेच खडसेंनी आ.मंगेश चव्हाणांच्या मुक्ताईनगरातील उमेदवारीला आक्षेपदेखील घेतला होता. मात्र, हा आक्षेप मान्य न झाल्याने मंदाकिनी खडसे या बिनविरोध होवू शकल्या नाहीत. मुक्ताईनगर तालुक्यात होणार्‍या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र सशक्त करण्यासाठी महात्मा फुलेच्या मौलिक विचारांची गरज : माजी कुलगुरु डॉ.निंबा ठाकरे

धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांमध्येच लढत

धरणगाव तालुका मतदार संघातून राष्ट्रवादीच्या संजय पवार आणि वाल्मिक पाटील या दोन्ही पदाधिकार्‍यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. संजय पवार यांनी भाजप शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवित आहेत तर वाल्मिक पाटील हे मविआ प्रणित सहकार पॅनलमधून रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे.

पारोळ्यात पारंपरिक लढत

पारोळा तालुका मतदार संघातून आ.चिमणराव पाटील विरुध्द माजी मंत्री डॉ.सतीश पाटील या दोन पारंपरिक विरोधकांची लढत होणार आहे. पारोळा हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाते. या दोन दिग्गजांमधील राजकारण हे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला परिचित आहे. राजकीय असो की सहकार या दोन्ही प्रकारच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांविरुध्द दंड थोपटत आले आहे. दूध संघाच्या यंदाच्या निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांमधील लढत ही काट्याची होणार आहे.

पालकमंत्र्यांविरुध्द महापौरांच्या सासुबाई

जळगाव तालुका मतदार संघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासुबाई मालती महाजन यांच्यात सरळ लढत होणार आहे. पालकमंत्र्यांविरुध्द महापौरांनी अनेक आरोप केलेले आहेत. त्याला पालकमंत्र्यांनी उत्तरदेखील दिले आहे. त्यामुळे या मतदार संघातील लढतीकडे लक्ष लागले आहे.

अमळनेरात आजी-माजी आमदारांची लढत

अमळनेर तालुका मतदार संघामधुन भाजपाचे माजी आ.स्मिता वाघ विरुध्द राष्ट्रवादीचे आ.अनिल भाईदास पाटील यांच्यात लढत होईल. अमळनेर तालुका मतदार संघाचे राजकारण हे या दोन्ही नेत्यांभोवती कायम फिरत राहिले आहे. स्व.उदय वाघ आणि आ. अनिल भाईदास पाटील यांच्यातील संघर्षदेखील तालुक्याने पाहीला आहे. त्यामुळे अमळनेर तालुका मतदार संघाच्या या लढतीकडेही लक्ष लागले आहे. जिल्ह्यात अनिल भाईदास पाटील हे विधानसभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत अमळनेर तालुका मतदारसंघातून निवडून येणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या माजी आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी ही पॅनलच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे.

10 डिसेंबर रोजी मतदान

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या 20 जागांसाठी प्रचाराला उद्या दि. 29 पासून सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत 441 मतदानासाठी पात्र आहेत. दि. 10 डिसेंबर या दिवशी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. दि. 11 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *