Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात 'इतक्या' विद्यार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा

जिल्ह्यात ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एमपीएससी ( MPSC ) तर्फे १६१ वर्ग अ आणि वर्ग ब च्या पदांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा (State Services Preliminary Exam) राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पार पडली. नाशिक जिल्‍ह्‍यातील ३२ केंद्रांवर परीक्षा झाल्या .

- Advertisement -

परीक्षेसाठी बसलेल्या १२ हजार ३८३ परीक्षार्थ्यांपैकी आठ हजार ८१३ परीक्षार्थींनी म्हणजेच ७१% परीक्षार्थींनी पेपर दिला. तर ३ हजार ५६९ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. जुन्या परीक्षा पद्धतीचा अखेरचा पेपर असल्याने अनेकांना पेपर सोपा गेला असला तरी सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी य विषयांच्या प्रश्नांनी घाम फोडला असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती.

राज्‍यभरात राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चे आयोजन केले होते. नाशिक जिल्‍ह्‍यातील ३२ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यावर्षीच्‍या परीक्षेत परीक्षार्थ्यांची बुबुळ ओळख पडताळणीद्वारे हजेरी नोंदविण्यात आली. त्‍यामूळे गैरसोय टाळण्यासाठी पहिल्‍या सत्रातील परीक्षा वेळेच्‍या दीड तास आधी केंद्रावर उपस्‍थित राहाण्याच्‍या सूचना दिलेल्‍या होत्‍या. त्‍यानुसार परीक्षा केंद्रांवर रविवारी सकाळी आठपासून परीक्षार्थ्यांची गर्दी बघायला मिळाली. सकाळी दहापासून पहिल्‍या पेपरला सुरवात झाली.

एकूण चारशे गुणांसाठीच्‍या या परीक्षेत दोन पेपर घेण्यात आले. सामान्‍य अध्ययन विषयाच्‍या पहिल्‍या पेपरमधील बहुतांश प्रश्‍न सोपे गेले. तर सीसॅट परीक्षेतील प्रश्‍नदेखील यावेळी सोपे असल्‍याची प्रतिक्रीया बहुतांश परीक्षार्थ्यांनी दिली. दुपारच्‍या सत्रात पार पडलेल्‍या सी-सॅटच्‍या पेपरकरीता आठ हजार ८१३ परीक्षार्थी हजर होते. तर तीन हजार ५६९ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. या संपूर्ण परीक्षेच्या नियोजनासाठी एक हजार १४० अधिकारी, कर्मचारी होते. परीक्षा केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्‍त तैणात केलेला होता.

सीसीटिव्ही च्या निगराणी मध्ये परीक्षा

यंदाच्‍या परीक्षेत वर्ग खोल्‍यांमध्ये सीसीटिव्‍ही कॅमेरा यंत्रणा बसविलेली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे चित्रीकरण केलेले असून, त्‍याची पडताळणी केली जाणार असल्‍याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्‍यानुसार रविवारी वर्ग खोल्‍यांमध्ये बसविलेल्‍या सीसीटिव्‍ही यंत्रणेद्वारे परीक्षा प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या