Breaking #आव्हाण्यात वाळूमाफियांचा राडा

दारु पिण्यास हटक्याने हॉटेलमालकाला बेदम मारहाण; वाळूमाफियांची वाढली मुजोरी
Breaking #आव्हाण्यात वाळूमाफियांचा राडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आव्हाणे फाट्याजवळील (Avhaṇe) रेस्टॉरंटमध्ये (restaurant) दारु पिणार्‍या वाळूमाफियांना (booze-drinking sand mafia) मालकाने हटकले (Removed by owner). त्याचा राग आल्याने सात ते आठ वाळू माफियांनी हॉटेलची तोडफोड (Vandalism of the hotel) करीत हॉटेलमालकाला (hotel owner) बेदम मारहाण (brutally beaten) केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्याने ग्रामस्थ व वाळूमाफिया यांच्यात तुफान राडा ( Rada ) झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोन जण जखमी (Two people injured) झाले आहे. तर तिघ वाळूमाफियांना पोलिसांच्या (police custody) ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील किरण छगन पाटील (वय-33) यांचे आव्हाणे फाट्याजवळ माऊली स्नॅक्स अ‍ॅन्ड कोल्ड्रींक्स नावाचे रेस्टॉरंट आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास याठिकाणी सात ते आठ वाळूमाफिया आले. त्यातील काही जण अगोदरच दारुच्या नशेत असल्याने त्यांनी रेस्ट्रॉरंटमध्ये दारु पिण्यास सुरुवात केली. हॉटेल मालक किरण पाटील यांनी त्यांना येथे फॅमिली नाश्ता करण्यासाठी येत असल्याचे सांगत तुम्ही याठिकाणी दारु पिवू नका, असे म्हणत हटकले. त्याचा राग आल्याने वाळूमाफियांनी हॉटेल मालकाशी हुज्जत घालीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हॉटेल मालकाला मारहाण होत असल्याचे दिसताच तेथे काम करणारे त्यांना वाचविण्यासाठी गेले. परंतु दारुच्या नशेत असलेल्या वाळूमाफियांकडून खुर्ची व विटा त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली.

Breaking #आव्हाण्यात वाळूमाफियांचा राडा
ब्लॉग : मी पाहिलेली कविता

हॉटेलमध्ये साहित्याची नासधूस

हॉटेलजवळ गावातील एका तरुणाचे दुकान असून तेथे काही ग्रामस्थ बसलेले होते. त्यांना हॉटेलमध्ये गोंधळ सुरु असल्याचे दिसताच त्यांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाळू माफियांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करीत त्यांना विटा देखील फेकून मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसून आले.

तिघ वाळूमाफियांना ठेवले डांबून

संतप्त झालेल्या आव्हाणे येथील ग्रामस्थांनी वाळूमाफियांना चोप देण्यास सुरुवात केल्याने चार वाळूमाफियांनी घटनास्थाळाहून पसार झाले. तर तिघांना ग्रामस्थांनी हॉटेलमध्येच डांबून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Breaking #आव्हाण्यात वाळूमाफियांचा राडा
VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

वाळूमाफियांची वाढती मुजोरी

आव्हाणे गावालगत असलेल्या नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. त्यामुळे या गावालगत असलेल्या हॉटेल्सह फाट्यावर वाळूमाफियांचा ठिय्याच बसलेला असतो. दरम्यान, या गावात यापुर्वी वाळूमाफियाकडून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तसेच वाळू उपसाला विरोध केल्यामुळे याठिकाणी अनेदा वाळूमाफिया व ग्रामस्थ समोरासमोर येवून वाद झाले आहे. दरम्यान, आज पुन्हा दारु पिण्यास मज्जाव केल्याने वाळूमाफियांकडून मारहाण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन्ही जखमींवर उपचार सुरु

या घटनेमध्ये रेस्ट्रॉरंट मालक किरण छगन पाटील रा. आव्हाणे व रविंद्र रमेश पाटील हे दोघ तरुण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहे.

ग्रामस्थांनी दिला वाळूमाफियांना चोप

ग्रामस्थांनी हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु वाळू माफियांकडून त्यांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळूमाफियांची यथेच्छ धुलाई केली . त्यामुळे वाळूमाफियांसह ग्रामस्थांमध्ये तुफान राडा झाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com