Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या'या' राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पूलास तत्वत: मंजूरी; कोट्यावधींच्या निधीची तरतूद

‘या’ राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पूलास तत्वत: मंजूरी; कोट्यावधींच्या निधीची तरतूद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दिंडोरी (dindori) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) उड्डाण पूल (flyover) व अंडरपासच्या (Underpass) कामास तत्वत: मान्यता दिली असून त्यासाठी 115 कोटी निधीची (fund) तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी या निधीची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) (NHAI) नाशिक विभागाची बैठक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या नाशिक (nashik) येथील कार्यालयात झाली. बैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (National Highways Authority of India) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील, आयएसटीपीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चांदवड (chandwad) येथील टी जंक्शन, रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना पादचारी मार्ग, मनमाडकडे (manmad) जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची (traffic jam) समस्या, मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) वर्दळीचे ठिकाणे त्याचप्रमाणे जऊळके, वणी (vani) व चांदवड (chandwad) येथील अपघात (accidents) प्रवणक्षेत्र याबाबींची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

या ठिकाणी उड्डाण पूल (flyover) व अंडरपास (Underpass) होण्यासाठी डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कामे लवकर सुरु करण्यात यावीत आणि कामे दर्जेदार व गुणवत्‍तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते, पुलाच्या कामांना मंजूरी

नाशिक विभागास 2022-23 या वर्षाकरिता रस्ते व पुलाच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी दिंडोरी येथील चांदवड जंक्शन 59.42 कोटी तर जऊळके वणी येथे उड्डाण पूल व अंडरपाससाठी 55.52 कोटी निधीची तरतूद करण्यात आहे, अशी माहिती यावेळी विभागाचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या