Monday, April 29, 2024
Homeनाशिकका वाढले कोरोनाचे अचानक ३९०० रुग्ण? वाचा इथे

का वाढले कोरोनाचे अचानक ३९०० रुग्ण? वाचा इथे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कोरोनाबाधितांच्या (Corona Positive) अहवालात एकूण बाधित आणि एकूण बरे झालेले रुग्ण यांची वाढलेली आकडेवारी ही समकरणाच्या (synchronization) प्रक्रियेमुळे वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आकडेवारी बघून घाबरण्याचे कारण नाही, असे आरोग्य प्रशासनाकडून (Health Department) कळविण्यात आले आहे…

कोविड १९ (Covid-19) साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांची आकडेवारी व अहवाल प्रसिध्द करण्यासाठी शासनातर्फे आयसीएमआर लॅब पोर्टल, सिव्ही अॅॅनलिटिकल पोर्टल आणि कोविड नॅशनल पोर्टल (Covid National Portal) हे तीन पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या तिन्ही पोर्टलवर असलेल्या आकडेवारीतील समकरणाची प्रक्रिया शासनातर्फे हाती घेण्यात आलेली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत जिल्ह्यात होणारे बाधितांची आकडेवारी प्रसिद्ध होत होती. मात्र, काल (दि.१७) रोजी अचानक ३ हजार ९१६ रुग्णांची वाढ झाली होती. ज्या रुग्णांचे आधार प्रमाणपत्र नाशिकचे आहे आणि ते वास्तव्याला जिल्ह्याबाहेर अथवा राज्याबाहेर होते. तेथे असताना बाधित होऊन पूर्णपणे बरे झाले आहेत अशा नागरिकांची ही आकडेवारी यात समाविष्ट करण्यात आलेली आहे.

समकरणाच्या प्रक्रियेमुळे काल ही एकूण बाधित आणि उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ही एक निरंतर सामान्य प्रक्रिया आहे.मात्र, त्या आकडेवारीचा संबंध दररोजच्या अहवालासोबत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नाशिक जिल्ह्यातील आधार कार्ड असलेले जे नागरिक इतर जिल्ह्यात वा राज्यात बाधित होऊन उपचारांती बरे झाले त्यांचा समावेश जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत झालेला आहे.

– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या