कराेना रुग्ण
कराेना रुग्ण
मुख्य बातम्या

कराेनाचा उद्रेक; २४ तासांतील सर्वाधिक केसेस

४ लाख ९५ हजार रुग्ण बरेही झाले

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली। New Delhi

देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे. तसेच ४ लाख ९५ हजार ५१२ रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्ण सात लाख ९३ हजार ८०२ इतके झाले आहेत. त्यातील दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार ९५ हजार ५१२ जणांनी करोनावर मात केली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com