Friday, April 26, 2024
Homeजळगावडीपीडीसीच्या सभेत... आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’

डीपीडीसीच्या सभेत… आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

आपल्या अभ्यासपूर्ण शैलीद्वारे जिल्हा नियोजन मंडळाची सभा (District Planning Board meeting) गाजवणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांचा आजच्या सभेत (meeting) मात्र महाभारतातील ‘अभिमन्यू’ (‘Abhimanyu’ from Mahabharata)झाल्याचे चित्र दिसून आले. वाळू, ग्र्रामीण भागाला पुरविण्यात येणार्‍या औषधी, जिल्हा नियोजन विभागाचा निधी यासह विविध विषयांवरून (various subjects) जाब विचारणार्‍या (Questioners) आमदार खडसेंना (MLA Khadse) सत्ताधारी मंत्री व आमदारांनी (Ruling Ministers and MLAs)तोडीस तोड उत्तरे देत घेरले (surrounded)

- Advertisement -

खडसेंच्या मुलाचे काय झाले? हा संशोधनाचा विषय

जिल्हा नियोजन मंडळाची सभा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात सोमवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित होते.

डीपीडीसीच्या निधीवरून खडाजंगी

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून महापालिकेला 60 कोटींचा निधी आत्तापर्यंत देण्यात आला आहे. या निधीवरून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्यात खडाजंगी झाली. डीपीडीसीच्या नियोजनात आणखी वाढ करून शहरासाठी निधी मिळावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली.

त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हा नियोजन मंडळाचा निधी हा केवळ ग्रामीण भागासाठी असतो. तो शहरी भागात देता येत नाही. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी ‘पालकमंत्र्यांना तो अधिकार आहे’ असे सांगितले. महाजनांना उत्तर देत आ. खडसे यांनी ‘कायद्याने पालकमंत्र्यांना तसा अधिकारच नसल्याचे’ सांगितले. तर आमदार भोळे यांनी ग्रामीण मतदारसंघातील जनता ही शहरातही राहते त्यामुळे त्यांना निधी मिळायलाच हवा असे प्रत्युत्तर दिले. यावेळी खडसेंनी जिल्हाधिकार्‍यांनी खुलासा करावा अशी मागणी केली.

Photos # …तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

आ. चंद्रकांत पाटील- आ. खडसेंमध्ये शाब्दिक चकमक

मुक्ताइनगर तालुक्यातील शासकीय क्रीडा संकूलाच्या विषयावरूनही आ. चंद्रकांत पाटील व आ. एकनाथराव खडसे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. आ. चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यासाठी नव्याने क्रीडा संकुल तयार करावे, अशी मागणी आमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. जे आहे ते खासगी शाळेच्या जागेवर आहे.

त्यावर खडसेंनी सांगितले, की तत्कालीन शासनाने क्रीडा संकूल शिक्षण संस्थेकडून काही वर्षासाठी भाड्याने घेतले आहे. त्यामुळे नवीन क्रीडा संकूलाची गरज नाही. त्यावर आमदार पाटील यांनी शासकीय क्रीडा संकूल करायला पाहिजे, भाड्याने घेतलेले रद्द करता येते, असा टोला लगावला. त्यावर खडसे म्हणाले, की हे आम्हाला माहित नव्हते, तेव्हा आम्ही लहान होतो, आता तुमच्याकडून माहित झाले अशी कोपरखळी मारली.

बी ग्रेड तुपाचे उत्पादनास दूध संघाला परवानगीच नाही!

औषधांच्या बिलांवरूनही तू तू-मै मै

डीपीडीसीतून मेडीसिनची बिले देण्याचा विषयावर आमदार खडसेंनी केव्हाची बिले आहे, कोरोना काळातील बिले असल्याचे नियोजन अधिकारी पाटील यांनी सांगितले. ती बिले शासन देईल डीपीडीचा निधी ग्रामीण भागासाठी वापरा अशी मागणी केली.

त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी ‘तुमच्या घरचे काय जाते, शासनाकडून निधी आला आहे, तो देवू द्या ना. तुमच्या काळातही (महाविकास आघाडी) असा निधी गेला आहे. उगाच खोडा घालू नका’ अशा शब्दात खडसेंना सुनावले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार उन्मेश पाटील यांनीही मेडीसीनच्या बीलांचा विषय आहे तो याआधीही दिला जात होता असे सांगितल्याने खडसे एक पाऊल मागे झाले.

570 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

आ. चव्हाण-आ. खडसेंमध्ये कलगीतुरा

तरसोद ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. ते काम का पूर्ण होत नाही, असा प्रश्न आमदार खडसेंनी विचारला. त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी उठुन उभे राहत सांगितले की, जिल्ह्यात एल.अ‍ॅन्ड. टी सारखी कंपनीने चिखली ते फागणे चौपदरीकरणाचा कंत्राट घेतला होता.

मात्र तो लोकप्रतिनिधींच्या त्रासामुळे पळून गेला, पळवून लावण्यात आला, असा टोला खडसेंना लगविला. त्यावरून तो पळून का गेला याची चौकशी करा, असे आमदार चव्हाणांनी सांगीतले. त्यावर खडसे म्हणाले, की सखोल चौकशी करा. यावेळी पालकमंत्री यांनी महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या