
मुंबई | Mumbai
संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या नजरा २०२३ मध्ये होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे (ICC ODI World Cup) लागल्या आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर आता विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंतच्या तारखा जाहीर (Dates Announced) झाल्याची माहिती समोर आली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचा थरार ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत खेळविला जाऊ शकतो. या वर्ल्डकपमध्ये तब्बल ४८ सामने खेळविले जाणार असल्याचे बोलले जात असून यात तीन बाद फेऱ्या होणार असल्याचे कळते.
तसेच हे सामने भारतातील १२ शहरांमध्ये खेळविले जाऊ शकतात. यात मुंबईसह (Mumbai) हैद्राबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट या शहरांचा समावेश असू शकतो. तर वनडे वर्ल्डकपचा अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येऊ शकतो.
दरम्यान, अद्यापपर्यंत बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही. कारण पावसामुळे कार्यक्रमात बदल केला जाण्याची शक्यता आहे. तसेच सर्व गोष्टींचा विचार करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.