Monday, April 29, 2024
HomeUncategorizedअकरावीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

मुंबई । Mumbai

मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे (pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) नाशिक (Nashik) अमरावती (Amravati) आणि नागपूर (Nagpur) या ठिकाणी अकरावीत प्रवेश (11th admission) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार असून यासाठी ३० मे पासून ऑनलाइन अर्ज प्रकिया सुरू होणार आहे…

- Advertisement -

महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (Online admission process) राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या पसंतीच्या महाविद्यालयांची प्राधान्यक्रम यादी द्यावी लागणार आहे. यानुसार किमान एक आणि जास्तीत जास्त १० महाविद्याल्यांची नावे देता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात मेरिट लिस्टनुसार (Merit list) प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून आपली अडचण सोडवता येणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करून आपले आवडते महाविद्यालय निवडू शकणार आहेत.

दरम्यान, दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा भरता येणार आहे. तर १० वी च्या निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या तसेच शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ साठी अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्वाची असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या