Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेश विकासात औद्योगिक क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका: कुशवाह

देश विकासात औद्योगिक क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका: कुशवाह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशाच्या विकासात औद्योगिक क्षेत्राची ( Industrial Sector ) महत्वाची भूमिका असून देशातील पन्नास हजार स्टार्टअपमध्ये अकरा हजारपेक्षा जास्त स्टार्टअप महाराष्ट्राचे आहेत तर 44 युनिकॉर्ममध्ये 11 महाराष्ट्रात आहेत.यापासून प्रेरणा घेऊन चांगले काम करण्यासाठी नाशिककरांनी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास व रोजगार आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह (State Skill Development and Employment Commissioner Dipendrasingh Kushwaha )यांनी केले.

- Advertisement -

नाशिक सिटीझन फोरमच्या (Nashik Citizen Forum )वतीने दर महिन्याला दिल्या जाणार्‍या आउट स्टँडिंग सिटीझन ऑफ नाशिक (Outstanding Citizen of Nashik ) या पुरस्काराचे संयुक्त वितरण नाईस हॉलमध्ये करण्यात आले. त्यावेळी कुशवाह बोलत होते.व्यासपीठावर नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी, माजी अध्यक्ष सुनील भायभंग, सरचिटणीस अविनाश पाटील, कोषाध्यक्ष सचिन गुळवे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुशवाह यांनी आपल्या कार्यकाळातील कामांची आठवण करून दिली. गोदावरी स्वच्छ करण्यासाठी नाशिककरांना आवाहन केले त्यावेळी पाच हजाराचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात 22 हजार नाशिककरांनी एकत्र येत नदी स्वच्छतेचा विडा उचलला. नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून 14 महिन्याच्या कार्यकाळात खूप काही शिकवून गेल्याचे त्यांनी सांगितले.नाशिकला ऐतिहासिकदृष्टया विशेष महत्त्व आहे.

समृद्ध शेती उद्योग यासोबतच देशातील सर्वात मोठी नदी नाशिकला आहे. नाशिकचे नागरिक म्हणून आपल्याकडे भरपूर क्षमता आहे मात्र गरज आहे ती लोकांच्या मानसिकतेची आणि इच्छाशक्तीची यातून नाशिकचा विकास नक्कीच साधला जाईल.आपल्या विभागाच्या कामाची माहिती देताना राज्यात 17 इंक्युबेशन सेंटर असून ती संख्या 70 पर्यंत नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

देशात 50 हजारापेक्षा जास्त स्टार्टअप आहेत ज्यात 11 हजार स्टार्ट अप हे महाराष्ट्राचे आहेत. 44 युनिकॉर्नमध्ये अकरा महाराष्ट्राचे आहेत. देशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्राचा 20 ते 30 टक्के वाटा आहे. त्याचवेळी नाशिकमध्येही खूप क्षमता आहेत नाशिककरांनी पुढे येत या क्षेत्रातही आघाडी घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आपल्या विभागातील कार्याबद्दल बोलताना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, कौशल्य विकास व्हावा या दृष्टीने ही शासन प्रयत्न करत आहे. प्रतिवर्षी चार ते पाच लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षीत लोकांना संस्थांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. ऑनलाइन जॉब फेअरच्या माध्यमातून दोन वर्षात 60 हजार लोकांना रोजगार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात नाशिक सिटीझन फोरमचे माजी अध्यक्ष डॉ. नारायण विंचूरकर यांनी सिटीझन फोरमच्या कार्याचा आढावा सादर केला. शहराच्या विकासासाठी व उत्थानासाठी योगदान देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी विशद केले.

यावेळी भटक्या व आजारी मोकाट प्राण्यांवर उपचार करून त्यांची देखभाल करणार्‍या शरण्या शेट्टी, नदी स्वच्छतेसाठी विशेष योगदान देणार्‍या चंद्रकिशोर पाटील तसेच एविएशन क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या मनीष रावल यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक सिटीजन फोरमचे माजी अध्यक्ष विक्रम सारडा(Former President of Nashik Citizen Forum Vikram Sarda ), जितूभाई ठक्कर, डॉ नारायण विंचुरकर, सुनील भायभंग यांच्या हस्ते दीपेंद्रसिंह कुशवाह यांचा सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचा परिचय सचिन गुळवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अविनाश पाटील यांनी केले पुरस्कार विजेत्यांचा परिचय विक्रम कापडिया, नरेंद्र बिरार, संदीप सोनार यांनी करून दिला. आभार संजीव बाफना यांनी मानले.

सत्कारार्थींचे मनोगत

शरण्या शेट्टी : हा पुरस्कार माझ्या कार्याचा नव्हे तर माझ्या सहकार्‍यांच्या योगदानाचा आहे. मी काही बोलण्यापेक्षा आपण कामाच्या ठिकाणी या आणि आपलेही योगदान या कामात द्या.

चंद्रकिशोर पाटील: नदी स्वच्छतेचा उपक्रम एकट्याचा नसून प्रत्येक नागरिकांने यात सहभाग घेऊन नदीला आई म्हणत तिची जोपासना केल्यास नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.

मनीष रावल : उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या विमान सेवेला गती देण्याची भावना जागृत झाली. वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करताना संस्थेच्या मान्यवरांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांच्या योगदानातूनच हे कार्य मी करू शकलो.

- Advertisment -

ताज्या बातम्या