खुशखबर : राज्यसेवा पूर्वपरीक्षा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

एमपीएससी
एमपीएससी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विद्यार्थ्यांना आयोगाने मोठा दिलासा दिला असून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 24 जून 2022 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. आयोगाच्या अधिकृत ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे....

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज भरण्याऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आयोगाने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे समजते आहे. त्यानुसार, आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

एमपीएससीच्या माध्यमातून विविध शासकीय पदांवर नोकरभरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने या निवड प्रक्रियेत 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल सहा संधी (MPSC Exam Attempts), उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी निश्चित केल्या होत्या.

निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला असून यात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com