Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याइंटर्नशिप बाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

इंटर्नशिप बाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासी Tribals भागात राहणार्‍या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा Good health facilities मिळाव्यात आणि येथील जनतेच्या समस्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना trainee doctors समजल्या पाहिजेत. यादृष्टिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने Maharashtra University of Health Sciences महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप government hospital internship सक्तीची करण्यात आली आहे.

- Advertisement -

देशातील 80 टक्के जनता ग्रामीण भागात तर 20 टक्के नागरिक शहरात राहतात. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नसल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप सक्तीची केली आहे.

तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील अव्वल विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता ई-ऑफिस संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पध्दतीनेच होणार असल्याने येत्या नवीन वर्षात विद्यापीठ पेपरलेस करण्याचा संकल्प या विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर Vice Chancellor Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar ​यांनी केला आहे.

​येत्या दोन वर्षात आरोग्य विज्ञान विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. विद्यापीठाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याचे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहेत. यात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, अभ्यासक्रमातील बदल, डीजिटल टेक्नॉलॉजिचा अधिक वापर करण्यासोबतच विद्यापीठाला सर्वात प्रथम पेपरलेस करण्याचा संकल्प कुलगुरु डॉ.कानिटकर यांनी केला आहे.

येत्या दोन महिन्यांत ही संकल्पना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यादृष्टिने विद्यापीठाने आवश्यक बाबींची पुर्तताही केली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रारंभीच विद्यापीठाचे कामकाज ई-ऑफिसच्या माध्यमातून सुरु होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या