लोकशाहीत सेवाभावाला महत्व

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सेवा भावनेतून नागरिकांची कामे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा पंधरवडा ( Service Fortnight )साजरा करण्यात आला. याच सेवाभावनेतून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडल्यास लोकशाही अधिक बळकट होईल. तसेच जिल्ह्याचा विकास साधताना आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar)यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सिकलसेल आजार निदान व उपचार शिबिर तसेच दिव्यांगाना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाल्या , सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार होणे गजरेचे आहेत. या आजाराबाबत जनजागृती करून पुढच्या पिढीत हा आजार जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच कुपोषणाबाबत सर्वच आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्या मदतीने ग्रामीण भागातील प्रत्येक गरोदर मातेची तपासणी करण्यात येवून त्यांना मुल गर्भात असतांनाच पोषक आहार देण्यावर भर देण्यात आहे. तसेच कोविड काळातही आरोग्य यंत्रणेने हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर केलेले लसीकरणाचे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.

सर्वच आघाडीवर आपण प्रगती करतांना आपण निसर्गाच देणं लागतो ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ही डॉ. पवार यांनी यावेळी केले.

प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येवून प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांग बांधवांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्रवणयंत्रांचे व कुबड्यांचे डॉ. पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच सिकलसेल बाबत रक्त तपासणीसाठी नियोजन भवनात आरोग्य विभागामार्फत स्टॉल देखील लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे यावेळी तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *