Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारेमडेसिवीर वितरण कार्यप्रणाली लागू

रेमडेसिवीर वितरण कार्यप्रणाली लागू

नाशिक। प्रतिनिधी

रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा व काळाबाजाराच्या प्रकारानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच हे इंजक्शन वापर व वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगीतले.

- Advertisement -

करोनाच्या उद्रेकादरम्यान रूग्णांना रेमडेसीव्हिर इंजेक्शन वापराचे प्रमाण वाढले होते. यामुळे तुटवडा निर्माण झाल्याने आठवडाभर रूग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी वणवण भटकत असल्याचे चित्र होते. अखेरीस या नातेवाईकांनी आंदोलन केले होते. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घेत अन्न व औषध प्रशासन विभागाकाडील मार्गदर्शन सुचनांनुसार या इंजक्शनच्या वितरण सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांची घटना प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

रेमेडीसीवर इंजेक्शन मागणी बाबत या समितीने मागणी अर्जाचा विहित नमुना तयार केला आहे. करोनाग्रस्त रूग्णाच्या स्कोरनुसार उतरत्या क्रमाने इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सबंधीत रूग्णालयांनी विहित नमुन्यात दररोज सकाळी 9 वाजता जबाबदार अधिकार्‍याच्या सही शिक्कयानिशी पीडीएफ किंवा एक्सल स्वरूपातील स्वॉफ्ट कॉपी समितीच्या[email protected] या संकेतस्थळावर पाठवायचा आहे.

सर्व रूग्णालयांच्या प्राप्त मागणीनुसार व इंजेक्शनच्या उपलब्धतेनुसार निवासी वैद्यकीय अधिकारी त्या त्या रूग्णालयांना कोटा मंजूर करतील. तसेच तो कोटा कोणत्या वितरकाकडून घ्यायचा हे नमुद करतील. त्यानुसार रूग्णालयांनी आपला कोटा ताब्यात घ्यायचा आहे. तसेच कार्यस्थळावरच इंजेक्शनवर रूग्णाचे नाव लिहायचे आहे. तर वापर झाल्यानंतर रिकाम्या बाटल्या जतन करून ठेवायच्या आहेत. तपासणीस येणार्‍या भरारी पथकास रिकाम्या बाटल्या तपासणीसाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या कार्यप्रणातील वेळेवर माहिती न भरल्यास गरजु रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास जबाबदारी सबंधीत रूग्णालयाची राहणार आहे.

हॉस्पिटल्स ना 4153 इंजेक्शन

काल सर्वांना त्यांच्या नोंदवलेल्या मागणीच्या प्रमाणात इंजेक्शन मिळाले आहेत.पहिल्याच दिवशी मागणी पूर्ण करता आली. ‘काल आपण स्वहस्ते चार्ट तयार करून कार्यपद्धती ठरवून दिली होती त्यावर आज आमच्या टीम ने कष्टपूर्वक प्रत्यक्ष अंमलबजावणी केली याचा आनंद आहे. या सर्व कार्यपद्धतीबद्दल हॉस्पिटल असोसिएशन ने समक्ष भेटून दुपारी समाधान व्यक्त केले.’ जिल्ह्यातल्या 101 हॉस्पिटल्स ना 4153 इंजेक्शन चे वितरण केले आहे. यामध्ये शासनाने 10 एप्रिलच्या आदेशाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणार्‍या सर्व रुग्णांना इंजेक्शन आज मिळाले आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या