Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांनो सावधान! हवामान खात्याचा पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे आहे पावसाची शक्यता?

शेतकऱ्यांनो सावधान! हवामान खात्याचा पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे आहे पावसाची शक्यता?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील तापमानात दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहेत. राज्यातील विविध भागांत तापमानात वाढ होतांना दिसत आहे. तर आता राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच पावसाच्या सरीही (RAINFALL FORECAST) कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. (Weather Forecas)

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता (Rainfall) आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हवामान खात्याने (IMD alert) येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.

सोमवारी (०७ मार्च) नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि अमरावती या आठ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे.

याशिवाय पालघर, पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार असून येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यानंतर मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तसेच आकाशात मोठ्या प्रमाणात विजा चमकणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. बुधवारी देखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

दरम्यान राज्यात तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत होत्या. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता पावसाच्या सरी बरसल्यानंतर नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. पण अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सध्या रब्बीचा हंगाम काढणीला आलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या