उकाड्याने नागरिक हैराण! राज्यातील तापमान आणखी वाढणार

हवामान विभागाचा अंदाज
उकाड्याने नागरिक हैराण! राज्यातील तापमान आणखी वाढणार

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात कमालीचा बदल होत आहेत. कुठे पाऊस तर कुठे उकाड्याने हैराण व्हायची परिस्थिती आहे. दरम्यान हवामान विभागाकडून एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला आहे.

सोमवारपासून (२८ मार्च) राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापामानात किंचित घट झाली होती.

Related Stories

No stories found.