Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागुलाबी थंडी टिकणार फेब्रुवारी अखेरपर्यंत

गुलाबी थंडी टिकणार फेब्रुवारी अखेरपर्यंत

नाशिक | प्रतिनिधी

हवामान विभागाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे की, यंदाची थंडी अधिक कडाका देणारी असेल. याबाबत आणखी एक ट्विट हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये हिवाळ्याच्या आगामी हंगामातउत्तर, उत्तर-पश्चिम व मध्य भारताच्या बहुतांश उपविभागांमध्ये तसेच पूर्व भारतामधील काही विभागांमध्ये किमान तापमानात कमालीची घट बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाकडून दरवर्षी उन्हाळा व हिवाळ्याच्या हंगामासाठी पुर्वानुमान जाहीर करण्यात येते.

त्यानुसार, देशातील बहुतांश भागांमध्ये डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भागांमध्ये व दक्षिण भारतातील बहुतांश उपविभागांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या