Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचांगली बातमी : स्कायमेटनंतर IMD चा सामान्य पावसाचा अंदाज, पाहा कसा असणार...

चांगली बातमी : स्कायमेटनंतर IMD चा सामान्य पावसाचा अंदाज, पाहा कसा असणार पाऊस

नवी दिल्ली

दोन दिवसांपुर्वी स्कायमेटने देशात यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आता IMD तर्फेही पावसाचा अंदाज आज जाहीर झाला. त्यानुसार यंदा सरासरी ९८ टक्के पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज IMDमार्फत वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

खूशखबर : सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस : पाहा, कोणत्या महिन्यात किती पाऊस

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा देशात बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती सामान्य राहील, असा अंदाज देण्यात आला होता. यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यंदा पावसाचा अंदाज हा सरासरी ९७ टक्के ते १०४ टक्के दरम्यान लॉग पिरियड एव्हरेज (एलपीए) असा असेल. येत्या चार महिन्यांसाठी अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यापुढील अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी मांडण्यात येईल, असे IMD मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

कसा ठरतो अंदाज

तूट म्हणजे ९० टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद असा अंदाज मानला जातो. सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के ते ९६ टक्के असा पाऊस गणला जातो. सरासरी म्हणजे ९७ टक्के ते १०४ टक्के अशी पावसाची गणना होते. तर सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०३ ते १०० टक्के दरम्यानचा पाऊस हा गणला जातो. अतिवृष्टी म्हणजे ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी म्हणून गणली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या