रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रीय

रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रीय
पाऊस File PhotoRain

पुणे Pune

राज्यात गेले काही दिवस धुमाकुळ घालणाऱ्या पावसाने (rain)काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु १२ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (imd)व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस (heavy rain)पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. मध्य भारताकडे सरकताना ही प्रणाली तीव्र होणार असून, त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, नाशिक

कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com