Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedIMDचा अंदाज : नाशिक, जळगाव, नगरमध्ये थंडीची लाट

IMDचा अंदाज : नाशिक, जळगाव, नगरमध्ये थंडीची लाट

राज्यातील काही भागांत गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता येत्या दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्रातील तापमान २-४ अंशांनी घसणार (cold wave)आहे. यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक, नगरमध्ये (jalgaon-nashik)तीन-चार दिवसांत तापमानात घट होणार आहे. तसेच मराठवाड्यात गारपीटची शक्यता आहे.

उत्तर-पश्‍चिमेकडून वाहनाऱ्या थंड वाऱ्यांमुळे(Western Disturbances) यापुढे किमान तापमानात अजून घट होणार असून, सोबतच आर्द्रता वाढल्याने अवकाळी पावसाचेही संकेत हवामान विभागाने दिले आहेत.(IMD) राज्यात सर्वत्र किमान तापमान १०-१२ अंश सेल्सिअसच्या आसपास असणे म्हणजे शीत लहर सक्रिय असल्याचे सूचक आहे. त्यात मध्य महाराष्ट्र म्हणजेच जळगाव, धुळे, नाशिक, नगर मध्ये तापमानात अजून घट होणार आहे.

- Advertisement -

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या