शेतकऱ्यांसाठी चिंताग्रस्त बातमी : पुढील तीन दिवस पुन्हा पाऊस

शेतकऱ्यांसाठी चिंताग्रस्त बातमी : पुढील तीन दिवस पुन्हा पाऊस

उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार (heavy rainfall ) पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD)वर्तवला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची (hailstorm alert ) शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत.

राज्यात आज बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील १३ जानेवारीपर्यंत मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता पुढील काही तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली आहे.

शेतकऱ्यांसाठी चिंताग्रस्त बातमी : पुढील तीन दिवस पुन्हा पाऊस
...तर राज्यातील बार, दारुची दुकाने बंद

याशिवाय पुण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Nagar), जालना, औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या बारा जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com