IMD : नाशिक, नगर, जळगावमध्ये पुन्हा पावसाचा इशारा

IMD : नाशिक, नगर, जळगावमध्ये पुन्हा पावसाचा इशारा

राज्यात उन्हाळा, आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला आहे. आता नववर्षाच्या सुरुवातीलाही राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD)वर्तवला आहे. यामुळे पिकांना पुन्हा फटका बसणार आहे. (Rainfall in Maharashtra) नाशिक (nashik), जळगाव (jalgaon), धुळे, नंदुरबार, नगरसह (nagar)राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस बरसणार आहे.

IMD : नाशिक, नगर, जळगावमध्ये पुन्हा पावसाचा इशारा
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नाशिकमध्ये (nashik)१ डिसेंबर रोजी दिवसभर व रात्रभर पाऊस झाला. यामुळे गेल्या ५४ वर्षातील विक्रम मोडीत निघाला आहे. यापुर्वी १६ डिसेंबर १९६४ मध्ये सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी ५३.८ मिमी पाऊस झाला.

हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी टि्वट केले आहे की, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 - 9 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

6 जानेवारी धुळे,नंदुरबार

7 जानेवारी धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर

8 जानेवारीठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग

9 जानेवारीमराठवाडा आणि विदर्भातील काही भाग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com