IMD चा अंदाज : राज्यात पुन्हा पाऊस, जळगावसह या जिल्ह्यांना इशारा

IMD चा अंदाज : राज्यात पुन्हा पाऊस, जळगावसह या जिल्ह्यांना इशारा
पाऊस

राज्यात उन्हाळा, आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला आहे. यामुळे वर्षाचा शेवटीही राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD)वर्तवला आहे. यामुळे पिकांना पुन्हा फटका बसणार आहे. (Rainfall in Maharashtra) २८ डिसेंबर रोजी राज्यात पुन्हा पाऊस बरसणार आहे.

पाऊस
ही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नाशिकमध्ये (nashik)१ डिसेंबर रोजी दिवसभर व रात्रभर पाऊस झाला. यामुळे गेल्या ५४ वर्षातील विक्रम मोडीत निघाला आहे. यापुर्वी १६ डिसेंबर १९६४ मध्ये सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी ५३.८ मिमी पाऊस झाला.

नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावलं आहे. मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. यासंदर्भातील टि्वट हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी केले आहे. त्यात औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत;तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com