IMD : नाशिकसाठी आज ऑरेंज अलर्ट

IMD : नाशिकसाठी आज ऑरेंज अलर्ट

येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy rain) होऊ शकतो असा, अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD)वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिक(nashik), नगर(nagar), जळगाव(jalgaon), धुळे(dhule), नंदुरबारात (nandurbar)मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आज तीव्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होणअयाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K S Hosalikar)यांनी यासंदर्भात टविट केले आहे.

कोकणातील जिल्ह्यांचा याचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आजसाठी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे.

ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌लर्ट दिला आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

IMD : नाशिकसाठी आज ऑरेंज अलर्ट
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com