IMA चे केंद्र सरकारला खडे बोल, म्हणाले...

IMA
IMAIMA

नवी दिल्ली

डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला खडे बोल सुनावले आहे. देशातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाउन परिणामकारक नाही. झोपेतून जागे व्हा, अशी संतप्त टीका आयएमएने (IMA)केली आहे.

नवी दिल्ली

डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला खडे बोल सुनावले आहे. देशातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाउन परिणामकारक नाही. झोपेतून जागे व्हा, अशी संतप्त टीका आयएमएने (IMA)केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारला राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे’ असे म्हणत हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावला. त्यामुळे आयएमएने एक प्रसिद्धीपत्रक काढले असून, केंद्र सरकारच्या धोरणावर कडक टीका केली आहे.

IMA ने म्हटले आहे की, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जे काही निर्णय घेतले जात आहे. त्यांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. उच्चपदस्थ लोक स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घ्यायलाच तयार नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने देशात लॉकडाउन लागू करण्याची विनंती संघटना मागील २० दिवसांपासून केंद्र सरकारकडे करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लॉकडाउनने काहीही होणार नाही. वेगवेगळी राज्ये आपापल्या पद्धतीने लॉकडाउन करत आहेत. पण, याचा कोणताही फायदा होणार नाही. संघटनेनं लॉकडाउनसंदर्भात दिलेला प्रस्ताव केंद्र सरकारने कचराकुंडीत फेकला.

IMA
महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

IMA ने आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही सुनावले आहे. “झोपेतून जागे व्हा आणि करोना काळात उभ्या राहणाऱ्या समस्यांना तोंड द्या,” असे आयएमएने म्हटले आहे. संघटना केंद्र सरकारकडे सातत्याने विनंती करत आहे की, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केली जावी. उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांना वेळ आणि सुविधा दिल्या जाव्यात, जेणेकरून ते वाढत्या रुग्णसंख्येला योग्य पद्धतीने हाताळतील. त्यामुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासही मदत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने लसीकरणाची प्रक्रिया इतक्या उशिराने का सुरू केली? सर्वांपर्यंत लस पोहोचेल अशा पद्धतीने लसींचं वाटप का केलं गेलं नाही? तसेच वेगवेगळ्या लसींचे दर वेगवेगळे का निश्चित करण्यात आले?, असा सवालही IMA ने केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com