मी जातोय पलीकडे...नववर्षाचा सूर्योदय करण्यासाठी!

छायाचित्रकार कैलास नवले
छायाचित्रकार कैलास नवले

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सूर्यास्त म्हणजे कोणासाठी सांजवेळ, तर कोणासाठी परतीचा प्रवास, कोणासाठी असते प्रेमाची उधळण तर कोणासाठी मात्र, सरत्या वर्षाची आठवण. सूर्यास्त नेमहीप्रमाणे झालाय, पण नवी सुरूवात करण्यासाठी, झालं गेलं विसरून, नव्या उमेदीने जगण्यासाठी.

सरत्या वर्षातला हा मावळता सूर्य इतर दिवसांसारखाच असतो..दररोज तसाच उगवतो अन् तसाच मावळतो. तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला..नव्या वर्षात मी पुन्हा आशेच्या नव्या किरणांना सोबत घेऊन येत तुमच्या सोनेरी स्वप्नांची झळाळी देईल. म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस. तो असतो नव्या वर्षाचा आरंभ! नव्या स्वप्नांचा प्रारंभ !! (हे चित्र टिपले आहे छायाचित्रकार कैलास नवले यांनी)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com