लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथे आयशर वाहन व अवैध मद्यसाठा असा सुमारे १४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अवैधरीत्या होणारी मद्याची वाहतूक व विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकातील अधिकारी व अंमलदार दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दिंडोरी पेठ रोडवर आशेवाडी शिवारात एका आयशर वाहनावर छापा टाकला.

छाप्यात विशाल साळबा आंधळे (वय ३३, रा. मोरवाडी, नवीन नाशिक, नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून ४ लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा व एमएच १५ एफव्ही ३७७७ या क्रमांकाचे आयशर वाहन असा एकूण १४ लाख ६९ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दिंडोरी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com