बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बिबट्याच्या अवयवाची तस्करी (Leopard organ trafficking) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर (Igatpuri and Trimbakeshwar) प्रादेशिक वन परिक्षेत्र (Regional Forest Zones) कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मोठे यश आले आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त माहितीवरून बनावट ग्राहक म्हणून बिबट या वन्यप्राण्याच्या कातडीची खरेदी करण्यासाठी मौजे अंबोली. ता. त्र्यंबकेश्वर येथे सदरचे आरोपी इसम मुद्देमाल (बिबट कातडी) घेऊन आले असता त्याच ठिकाणी सापळा रचण्यात आलेल्या इगतपुरी (प्रादेशिक) वनक्षेत्रातील कर्मचारी व सदर आरोपी यांच्यात झटापट झाली. त्याच दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस (Forest Range Officer Ketan Biraris) यांनी हवेत गोळीबार केला.

त्यानंतर सर्व पथकाने प्रतिकार करून प्रकाश लक्ष्मण राऊत, (४३) रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर परशुराम महादु चौधरी (३०) रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर, यशवंत हेमा मौळी (३८) रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर आणि हेतु हेमा मौळी (३८) रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर यांच्या मुसक्या आवळल्या.

या कारवाईत वन अधिकाऱ्यांनी वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव (Forest Circle Officer Bhausaheb Rao) यांना बनावट ग्राहक बनवुन बिबट्याच्या अवयवांची तस्करी (Organ trafficking) करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यास सांगितले. त्या व्यक्तींनी या व्यवहारासाठी ठराविक रक्कम देऊन व्यवहार करण्याचे ठरवले. मात्र चार वेळा या व्यक्तींनी आपली ठिकाणे बदलून हूल देण्याचा प्रयत्न केला होता.

अखेर आज वनकर्मचा-यांनी ही कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली बिबट प्राण्याची कातडी व दोन दुचाकी वाहन ताब्यात घेतले. या रॅकेटमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तस्कर असावेत असा संशय आहे. तसेच या तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान, तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग (Pankaj Kumar Garg) यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने यांच्यासह वनरक्षक फैजअली सय्यद, आर. टी. पाठक, मुज्जू शेख, गुव्हाडे, पी. डी. गांगुर्डे, जी. डी. बागुल, विठ्ठल गावंडे, एस. पी. थोरात, सी. डी. गाडर, राहुल घाटेसाव, त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनक्षेत्रातील वनरक्षक संतोष बोडके वनपरिमंडळ अधिकारी ए. एस. निंबेकर, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, वनरक्षक एन ए गोरे, के. वाय. दळवी, एस. ए. पवार यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी अन्य संशयित लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com