इगतपुरी रेव्ह पार्टी : अभिनेत्री हीना पांचाळचा जामीन मंजूर

इगतपुरी रेव्ह पार्टी : अभिनेत्री हीना पांचाळचा जामीन मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरीमधील हायप्रोफाइल रेव्ह पार्टी प्रकरणी (Rev party in Igatpuri) एनडीपीएसच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बॉलिवुड अभिनेत्री हिना पांचाळसह (Hina Panchal) अन्य संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (दि.१९) सोमवारी जामीन मंजुर केला आहे. तर संशयित पियुष सेठीया (Piyush Sethia) आणि हर्ष शहा (Harsh Shah) याचा जामीन मात्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे...

इगतपुरीतील (Igatpuri) दोन आलिशान बंगल्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सर्रास सेवनासह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी एकत्र येत दोन दिवसीय पार्टी रंगविल्याबाबत ग्रामीण पोलिसांनी शनिवारी २६ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्यांवर छापा मारला होता.

यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात पोलिसांना अद्यापही दोन संशयित हवे असून त्यांचा शोध सुरु आहे.

दरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर (Ajay Misar) यांनी सरकारच्या वतीने युक्तीवाद केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com