शेतकर्‍यांना अडचणीत आणू नका : खा.डॉ. पवार

 शेतकर्‍यांना अडचणीत आणू नका : खा.डॉ. पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकर्‍यांना ऐन अडचणीच्या काळात मदत करता येत नसेल तर किमान त्यांना अडचणीत तरी आणू नका अशा विविध मुद्यांवर वीज महावितरणच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत खासदार डॉ. भारती पवार यांनी संताप व्यक्त केला. बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, वीज महावितरणचे दरोली व इतर अधिकारी उपस्थित होते.

सध्या शेतकरी , सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असून वीज महावितरण मंडळाच्या मनमानी कारभारामुळे सक्तीचे विजबिले आकारण्यात येत आहेत. ज्यांचे वीजबिल थकीत आहे, अशा शेतकर्‍यांचे विजेचे कनेक्शनच कट केले जात आहे. त्यामुळे शेतातील पिकांना विजेअभावी पाणी कसे द्यायचे असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांसमोर पडला आहे.

शेतकर्‍यांना विजबिलात सवलत देऊन त्यांना हप्ते करून देऊन वीज बिले भरण्याची सवलत राज्य सरकारने द्यावी, शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना, जनतेला वाढीव बिले कमी करून त्यांना योग्य बिले द्या, शेतकरी हताश निराश झाले असून या संकटकाळात राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे अपेक्षित असतांना त्यांच्याशी असहकार्याची भुमिका घेऊन त्यांना अधिकच्या संकटात ढकलू नका.अशा विविध मुद्यांवर वीज महावितरणच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत खासदार डॉ. भारती पवार यांनी संताप व्यक्त केला .

करोना संकट काळातून शेतकरी सावरत नाही तोच आस्मानी संकटाने शेतकर्‍यांना फटका दिला आणि आता राज्य सरकारने अधिकचा महसूल मिळावा म्हणून वीजबिल भरण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. कृषी संजीवनी योजना ही थकीत बिले वसुलीसाठी नसून वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने खंडित केला जातोय. जनतेच्या वीज बिलाच्या माध्यमातून 9500 कोटींचा महसूल राज्याला मिळत आहे. कमीतकमी जी अवाजवी बिले आली आहेत, त्याची फेरतपासणी करून बिले पाठवावीत.

तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांप्रमाणे लॉकडाऊनच्या काळातील बिलात सवलत देण्यात यावी. विजेच्या तारा खाली आल्याने अनेक ठिकाणी शॉट सर्किट होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याकडेही लक्ष घालून तारा वर ओढून होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल,अशा सूचना खा. डॉ. भारती पवार यांनी केल्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com