ICMR कडून होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, आता घरीच करता येणार करोना चाचणी

ICMR कडून होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, आता घरीच करता येणार करोना चाचणी

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर सुरुच असून रोज लाखोंच्या संख्येनं लोकांना करोनाची लागण होत आहे. दरम्यान, या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

याच दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरीच करोना चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता तुम्हीसुद्धा स्वतःची करोना टेस्ट करू शकता.

ICMR ने यासाठी CoviSelf या किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून करोना रॅपिड अँटीजन टेस्टिंग करण्यासाठी नाकातील स्वबची आवश्यकता असणार आहे. मायलॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेड कंपनीने रॅपिड अँटीजन टेस्टिंग CoviSelf या किटची निर्मिती केली आहे.

तसेच, या किटचा कोणत्याही प्रकारे गैरवापर झाले नाही पाहिजे असे ICMR ने स्पष्ट केले आहे. केवळ ज्या लोकांना करोनाची तीव्र लक्षणे आहेत आणि ज्या व्यक्ती करोनाबाधितांच्या संपर्कात होत्या अशा व्यक्तींनीच घरी कोरोना टेस्ट करण्यासाठी या किटचा वापर करायचा आहे असे ICMRने जाहीर केले आहे.

कशी करू शकता स्वतःची करोना टेस्ट?

होम टेस्टिंगसाठी COVISELF किट आणि मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करावं लागेल. COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचं आहे. त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत. ज्या मोबाइलवर हे ॲप डाऊनलोड करण्यात आलं आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा. हा डेटा थेट ICMR च्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल. मोबाईल ॲपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com