श्रीलंका आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या शर्यतीत टिकणार का?

श्रीलंका आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या शर्यतीत टिकणार का?

जिलॉंग | Geelong

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीचा दुसरा सामना श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध युएई (UAE) संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता करण्यात येणार आहे...

दोन्ही संघांना सलामी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.

श्रीलंका आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या शर्यतीत टिकणार का?
मालेगावमधील 'या' भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; 'पाहा' व्हिडीओ...

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या उदघाटनाच्या सामन्यात आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दुबळ्या नामिबियाविरुद्ध श्रीलंकेला ५५ धावांनी पारभाव पत्कारावा लागला होता. हा पराभव मागे सारून दसून शनाकाचा श्रीलंका स्पर्धेत जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. \

श्रीलंका आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या शर्यतीत टिकणार का?
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

तर दुसरीकडे हॉलंड संघाने यूएईवर अखेरच्या शतकात ३ गडी राखून सनसनाटी विजयाची नोंद केली आहे. आता श्रीलंका आणि युएई संघाना ही अखेरची संधी असणार आहे. पराभूत संघाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागणार आहे. तर विजेत्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com