ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आज भिडणार

ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आज भिडणार

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाचे (England vs Australia) आव्हान असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळविण्यात येणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे...

तसेच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला (Matthew wed) करोनाची (Corona)लागण झाली आहे. शिवाय जोश इंग्लिश दुखापतीमुळे माघारी परतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार ? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांचे प्रत्येकी २ सामने झाले असून दोन्ही संघाना १-१ असा विजय मिळवला आहे. इंग्लंडने सलामी सामन्यात अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजयी सुरुवात केली होती. मात्र आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात डूकवर्थ लुईस नियमाने ( Duckworth-Lewis rule) इंग्लंडला पराभव पत्कारावा लागला होता. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असल्यामुळे दोन्ही संघाना बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय अनिवार्य असणार आहे.

दरम्यान, आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी २० मालिकेत इंग्लडने ऑस्ट्रेलिया संघाला २-० ने पराभूत केले होते.याचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे श्रीलंकेवरील विजयाने फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलिया इंग्लंडला नमवून आपला दुसरा विजय साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com