Friday, April 26, 2024
Homeक्रीडाइंग्लंडचा पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय; टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरले नाव

इंग्लंडचा पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय; टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरले नाव

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात सुरु आयसीसी असलेला टी२० विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लडने पाकिस्तानवर (England vs Pakistan) ५ गडी राखून विजय मिळवत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे…

- Advertisement -

मेलबर्न येथील एमसीजी मैदानावर (MCG Ground Melbourne) झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ८ बाद १३७ धावांवर रोखले. यात फिरकीपटू आदिल राशिद व सॅम करनने शानदार गोलंदाजी केली.

दरम्यान, यानंतर पाकिस्तानकडून बाबर आझम व मोहम्मद रिझवान (Babar Azam and Mohammad Rizwan)यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली केली. तर शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या