ICC T20 World Cup : भारत - बांगलादेश आज भिडणार

ICC T20 World Cup : भारत - बांगलादेश आज भिडणार

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात एडिलेड मैदानावर (Adelaide Grounds) सामना खेळविण्यात येणार असून दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे...

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि बांगलादेशच्या खात्यात समान ४ गुण आहेत. मात्र भारताची धावगती बांगलादेशच्या तुलनेत अधिक सरस असल्यामुळे भारत पुढे आहे. तर सुपर १२ मध्ये दोन्ही संघाचा चौथा सामना असणार आहे. भारताचा आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा मानस असणार आहे.

तसेच सध्या बांगलादेशचे नेतृत्व अष्टपैलू शाकिब अल हसनकडे असून भारताची धुरा रोहित शर्माकडे आहे. भारताने सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दणक्यात सुरुवात केली होती.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सवर (Netherlands) ५६ धावांनी विजय साकारून आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली होती. पंरतु रविवारी पर्थ येथे झालेल्या सामन्यात आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान,या पराभवातून सावरून भारतीय संघ (Team India) नव्या उमेदीने बांगलादेशविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर या सामन्यात शाकिब अल हसन , लिटन दास , विराट कोहली ,सूर्यकुमार यादव हे स्टार प्लेअर्स असतील.तसेच सामन्याच्या दिवशी हवामान ढगाळ असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com