Monday, April 29, 2024
Homeक्रीडाWTC Final : अंतिम सामना जिंकणारा संघ होणार मालामाल; किती रक्कम मिळणार,...

WTC Final : अंतिम सामना जिंकणारा संघ होणार मालामाल; किती रक्कम मिळणार, वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Austrelia) आमनेसामने भिडणार आहे. मागच्या वेळी न्यूझीलंडने भारताचे कसोटीत जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले होते, पण यावेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाने कंबर कसली असून विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक भारतीय खेळाडूंनी इंग्लंड गाठून तयारीही सुरू केली आहे.

- Advertisement -

तत्पुर्वी, आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची तयारी सुरु केली असून विजेत्या आणि उपविजेत्या संघाला दिली जाणारी बक्षीस रक्कम आज आयसीसीकडून जाहीर केली आहे. ९ संघांमध्ये ३१ कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम वाटली जाणार आहे, असे आयसीसीने सांगितले.

राहुल गांधींना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप विजेत्याला १३ कोटींहून अधिक बक्षीस म्हणून रक्कम मिळेल. त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर संघांनाही पैसे मिळणार आहेत. उपविजेत्या संघाला साडे सहा कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला ३ कोटी ७० लाख, चौथ्या क्रमांकावरील इंग्लंड संघाला २.८९ कोटी, पाचव्या क्रमांकावरील श्रीलंकन संघाला १.६५ कोटी रुपये मिळतील.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत कडवी झुंज देणारा श्रीलंका ५ व्या स्थानावर होता. त्याला १ कोटी ६५ लाख २३ हजार ७०० रुपये मिळतील. तर सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान, आठव्या क्रमांकावर असलेला वेस्ट इंडिज आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला प्रत्येकी ८२ लाख रुपये मिळतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सांगितले की, WTC च्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. WTC च्या २०१९-२१ सीझनमध्ये जी बक्षीस रक्कम होती तीच यावेळी देखील आहे. अशा स्थितीत त्यात कोणतीही वाढ झालेली दिसत नाही.

“संजय राऊत म्हणजे राजकारणातील…”; शिवसेना नेत्याची टीका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप २०१२१-२३ च्या हंगामातील संघाच्या कामगिरीनुसार, रक्कम दिली जातेय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होणार आहे. गतवर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये फायनलचा थरार झाला होता. यामध्ये न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली होती.. भारतीय संघ उपविजेता ठरल होता.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं असून भारताने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत करत आपलं स्थान अंतिम फेरीत निश्चित केलं आहे. अंतिम फेरीचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार असून हा सामना ७ जून २०२३ ते ११ जून २०२३ दरम्यान खेळला जाईल, तसेच एक दिवस राखून ठेवला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या