मी घडवला गुजरात...

भाजप प्रचारासाठी मोदींचे नवे घोषवाक्य
मी घडवला गुजरात...

गांधीनगर । वृत्तसंस्था Gandhinagar

गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Elections)घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गुजरात निवडणूक जिंकण्याची धुरा भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या खांद्यावर टाकली आहे. ‘हा गुजरात मी बनवला आहे’असे नवे घोषवाक्य त्यांनी यावेळी पक्षाच्या प्रचारासाठी दिले. प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर विशेषत: नामोल्लेख न करता काँग्रेसवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी यांनी वलसाड जिल्ह्यातील कपराडा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. काही राजकीय पक्ष गेल्या 20 वर्षांपासून गुजरातला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहेत. यापूर्वीही गुजरातमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यावेळच्या निवडणुकीही त्यांचा दारुण पराभव होईल, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून केली. यंदाच्या निवडणुकीत भाजप विक्रमी फरकाने विजयी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

गुजरातमधील आदिवासी बांधवांच्या आशीर्वादाने मी माझी सभा सुरू करीत आहे हे माझे भाग्य आहे. यावेळी गुजरात भाजपला जिंकून देऊन नवा विक्रम करणार आहे, असेही मोदी म्हणाले. गुजरात निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी मी सज्ज आहे. शक्य होईल तेवढा वेळ मी प्रचाराला देईन, असेही मोदींनी सांगितले. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा त्यांच्या गृहराज्यातील हा पहिला दौरा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com