Thursday, April 25, 2024
Homeजळगावमी राऊतांना घाम फोडणारा, माझ्या नादी लागू नका

मी राऊतांना घाम फोडणारा, माझ्या नादी लागू नका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट (Thackeray group) व शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde group) गटाकडून ऐकमेकांवर होणार्‍या आरोप- प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण (political climate) तापले आहे. गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार ठाकरे गटाच्या मेळाव्यात पदाधिकार्‍यांनी केला. त्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil ) यांनी, माझ्या नादी लागू नका, मी काही साधा माणूस नाही. संजय राऊत (Sanjay Raut) सारख्यांना मी घाम फोडतो. तर, बाकीच्यांच काय? अश्या शब्दात ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब- देवकर

जळगाव शहरात नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री गुलाबाराव पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. या टीकेला ना.गुलाबराव पाटील यांनी काल शनिवारी रात्री धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी प्रत्युत्तर दिले आहे.

चोरल्यात डझनभर मोटारसायकली, पोलिसांनी करवली जेलची वारी

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो. विधानसभेच्या सभागृहात नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही ना.पाटील म्हणाले, अश्या शब्दात गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटांच्या पदाधिकार्‍यांना सुनावले आहे.

सावदा येथे तिहेरी अपघातात बालक ठार, तीन जखमीबारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

शरद पवारांना टोला

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर लोकांना आता बदल हवा आहे, असे शरद पवार म्हणाले. यावर नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार निवडून आल्यामुळे शरद पवार नक्कीच आनंदी असतील. मात्र, त्यामुळे राज्यातही सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणणे चुकीचे आहे, असा टोला ना.गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

.

लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?political big news # यामुळेच घोळ झाला : मुलगा मंत्री अन् स्वतःमुख्यमंत्री!

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याची उपस्थितीने आश्चर्य

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे शनिवारी रात्री विकासकामांचे उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबाराव पाटील, भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजय पवार देखील व्यासपीठावर उपस्थित राहिले. इतकेच नव्हे तर येथे मनोगत व्यक्त करतांना संजय पवार यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर केलला कौतुकांचा वर्षाव उपस्थितांच्या भुवया उंचविणारा ठरला

- Advertisment -

ताज्या बातम्या