इगतपुरीत दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक

इगतपुरीत दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
हायड्रो पॉवर प्रकल्प

मुंबई :

राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत(maharashtra government) सुमारे ३५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

हायड्रो पॉवर प्रकल्प
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

नाशिक (nashik)जिल्ह्यातील इगतपुरी (igatpuri)तालुक्यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा हायड्रो पॉवर प्रकल्प (hydro power plant)सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर (bhavali dam)हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.

कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगा वॅट क्षमतेचा पवन उर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

आज झालेल्या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

आज झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी Hydro व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसड्ब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com