हैदराबादचा राजस्थानवर विजय

IPL
IPL

दुबई । वृत्तसंस्था

आयपीएल 2020 प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठीच्या करो वा मरो सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 8 विकेटनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करत राजस्थानने 6 बाद 154 धावा केल्या होत्या. विजयासाठीचे हे लक्ष्य हैदराबादने 11 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले. या विजयामुळे सनरायजर्सने प्ले ऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात रॉबीन उथप्पा आणि बेन स्टोक्स यांनी केली. उथप्पा 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसग 36 धावा करून माघारी परतला. स्टोक्स देखील 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर जोस बटरल 5 तर कर्णधार स्टीव्ह स्मिथ 19 धावांवर बाद झाला. राजस्थानने 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या.

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवण्याची गरज होती. हैदराबादची सुरूवात खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 4 धावा करून पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर जॉनी बेयरस्टो 10 धावांवर तिसर्‍या षटकात माघारी परतला. 2 बाद 16 अशी धाव संख्या असताना मनिष पांडे आणि विजय शंकर यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी तिसर्‍या विकेटसाठी नाबाद 140 धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळून दिला.

मनिष पांडेने 47 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. यात 8 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तर विजय शंकरने 51 चेंडूत 52 धावा केल्या. या विजयामुळे हैदराबादचे 10 सामन्यातील 4 विजयांसह 8 गुण झाले आहेत आणि ते गुणतक्त्यात 5व्या स्थानावर पोहोचलेत. तर राजस्थान रॉयल्सचा संघ सातव्या स्थानावर गेला असून त्यांनी 11 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com