Monday, April 29, 2024
Homeदेश विदेश५५ हजारांची नाणी घेऊन पती पोहोचला कोर्टात अन् पुढे घडलं असं काही...

५५ हजारांची नाणी घेऊन पती पोहोचला कोर्टात अन् पुढे घडलं असं काही…

मुंबई | Mumbai

जयपूरच्या फॅमिली कोर्टातून (Court) एक अजब घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी त्रास देण्याच्या केसमध्ये कोर्टाने आरोपी पतीला तुरूंगात पाठवणे आणि पत्नीला पोटगी म्हणून ५५ हजार रूपये देण्याचा आदेश दिला होता. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम कोर्टात जमा केली. पण ही रक्कम पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

पतीने पोटगी म्हणून पत्नीला दिली जाणारी ५५ हजार रूपयांची रक्कम पोत्यांमध्ये भरून आणली होती. आता कुणालाही प्रश्न पडेल की, ५५ हजार रूपयांसाठी पोती कशाला लागतील? झाले असे की, पतीने ५५ हजार रूपयांची नाणी जमा केली आणि या नाण्यांचे वजन साधारण २८० किलो होते. त्यामुळे त्यांना ही नाणी (Coins) पोत्यात भरून आणावी लागली. पोत्यांमधून जेव्हा नाण्यांची खणखण ऐकू आली तेव्हा सगळेच हैराण झाले. ७ कट्ट्यांमध्ये १, २, ५ आणि १० रूपयांची नाणी होती. मात्र, नंतर कोर्टाने ही नाणी सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला.

तत्पूर्वी १२ वर्षांपूर्वी दशरथ कुमावत (Dashrath Kumawat) आणि सीमा कुमावत (Seema Kumawat) यांचे लग्न झाले होते. पण गेल्या पचा वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. सीमाने आपल्या पतीविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच कोर्टात खटला सुरु होता. मात्र पतीकडे २.२५ लाख रुपयांचा देखभाल भत्ता थकित आहे. पतीने देखभाल भत्ता न दिल्याने हरमाडा पोलिसांनी त्याला अटक करुन कोर्टात हजर केलं.

“मी अर्धवटराव तर देवेंद्र फडणवीस…”; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार

दरम्यान कोर्टाने त्याला तुरूंगात पाठवण्यासोबतच पोटगीच्या रकमेचा पहिला टप्पा भरण्याचा आदेश दिला. दशरत कुमावत तुरूंगात असल्याने त्याच्या परिवाराने ५५ हजार रूपयांची नाणी जमा केली. अजून त्याला १.७० लाख रूपये पत्नीला द्यायचे असून दुसरीकडे, ५५ हजारांची रक्कम नाण्यांच्या स्वरुपात दिल्याने पत्नी सीमा कुमावतचे वकील रामप्रकाश कुमावत यांनी हे छळ करण्यासाठी केले असून, अमानवीय असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे पती दशरथ कुमावतच्या वकिलांनी हे ५५ हजार रुपये वैध भारतीय चलन असून ती स्वीकार करण्याचे आवाहन केले.

दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी नाणी पाहून कोर्टानेही आश्चर्य व्यक्त केले. हे पैसे मोजायला १० दिवस लागतील असे कोर्टाने म्हटले आहे. आता या सर्व नाण्यांची मोजणी कुठे आणि कशी करायची? यासाठी कोर्टाने पतीला आदेश दिला आहे की, या सर्व नाण्यांची १-१ हजारांच्या पिशव्या तयार करत त्यांची मोजणी करा. २६ जूनला या नाण्यांची मोजणी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या