हृदयद्रावक! चुलीतील ठिणगीमुळे झोपडीला आग; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर | Solapur

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील (Barshi Taluka) गाडेगाव (Gadegaon) येथील वृद्ध महिला पाणी तापवण्यासाठी चुल पेटवित असताना वारे असल्यामुळे अचानक चुलीची ठिणगी उडाली. त्यामुळे झोपडीला भीषण आग लागल्याने या आगीत वृद्ध पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या आगीत भीमराव काशीराम पवार (वय ९५ वर्ष) आणि कमलबाई भीमराव पवार (वय ९० वर्ष) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

संग्रहित छायाचित्र
Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, दोघांचा मृत्यू

कमलबाई या नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास चुलीवर पाणी (Water) ठेवण्यासाठी उठल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या जवळील नातू प्रथमेश यास म्हैस सुटल्यामुळे बांधण्यासाठी उठवले. त्यावेळी नातू म्हैस (Buffalo) बांधत असताना झोपडीस आग (Fire) लागली.

संग्रहित छायाचित्र
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले...

दरम्यान, आग लागल्यानंतर तात्काळ दोघांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररूप धारण केले. त्यावेळी कमलबाई आपला पती आत झोपलेला असल्यामुळे त्याला उठवण्यासाठी गेल्या असता दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र
गुगल ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com