Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याप्रतिसाद देण्याची मानवी क्षमताच उत्तम उपाय!

प्रतिसाद देण्याची मानवी क्षमताच उत्तम उपाय!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

2020 हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ घडवणारे वर्ष म्हणून ह्या पिढीवर कधीही न विसरू शकणारी छाप सोडून जाईल, यात शंका नाही. गेल्या शतकात युद्धे, साथीच्या रोगांचा आणि नैसर्गिक आपत्तींच्या घटना ज्याप्रकारे घडल्या याकडे आपण पाहिले, तर 21 व्या शतकाची पहिली 20 वर्षे ही एक आशीर्वाद म्हणावी लागतील, असा संदेश द्रष्टे आध्यात्मिक योगी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी खास ‘देशदूत’च्या वाचकांना नववर्षानिमित्त दिला आहे.

- Advertisement -

आपल्या संदेशात सद्गुरूजी म्हणतात, विनाशकारी पर्यावरणीय संकेत उलगडत असताना, जेव्हा आपण आपले सर्व प्रयत्न भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाला जपण्यावर केंद्रित करण्याची नितांत गरज असताना, ही व्हायरसची महामारी आपल्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा धुळीस मिळवत आहे. परंतु ही महामारी जितकी आपलं आयुष्य अस्तव्यस्त करू शकत असली तरीही, ती अजूनही आपण हाताळू शकतो.

नागरिकांच्या जाणीवपूर्वक आणि जबाबदार कृतीने आपण ह्या व्हायरसचा नायनाट करू शकतो. प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी प्रतिसाद देण्याची मानवी क्षमताच यावर एक उत्तम उपाय आहे, फक्त ह्या महामारीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने नव्हे, तर एक अधिक सुसंस्कृत आणि शाश्वत जगासाठी नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी सुद्धा. निश्चितपणे, शक्यता आणि वास्तविकता यांच्यात एक अंतर आहे.

येत्या वर्षात, आपण सर्वांमध्ये एक उत्तम जग घडविण्यासाठी धैर्य, वचनबद्धता आणि चैतन्य बहरू, फुलू दे, जेणेकरून आपण एक उत्तम मनुष्य होऊ शकू आणि त्याद्वारे एक उत्तम जग घडले जाऊ शकेल. नैराश्य हा काही प्रगतीचा मार्ग नाही; तर प्रत्येक प्राणीमात्रांसाठी काय गरजेचे आहे ते निर्माण करण्यासाठी समर्पित होणे…सप्रेम आशीर्वाद!

- Advertisment -

ताज्या बातम्या