Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या‘श्री व्यंकटरमणा गोविंदा’च्या जयघोषात ब्रह्मोत्सव

‘श्री व्यंकटरमणा गोविंदा’च्या जयघोषात ब्रह्मोत्सव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

येथील कापडपेठेतील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात (Shri Venkatesh Balaji Temple) आज घटस्थापनेपासून ब्रह्मोत्सवास (Brahmotsav) उत्साहात प्रारंभ झाला.

- Advertisement -

सायंकाळी श्री व्यंकटरमणा गोविंदा…. (Shri Venkataramana Govinda) च्या गजरात श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथून पारंपरिक सुदर्शन दिग्विजय रथयात्रेस (Sudarshan Digvijaya Rathaya) प्रारंभ झाला. भाविकांंचा उदंड प्रतिसाद लाभला. जुन्या नाशिकमध्ये (old nashik) पारंपरिक मार्गाने रथयात्रा (Rath Yatra) निघाली.

आजपासून विजयादशमीपर्यंत (Vijayadashami) रोज सकाळी 9.30 ते 10 पर्यंंत श्रींंची स्वारी रोज एक नव्या वाहनावर आरुढ होईल. आज सकाळी घटस्थापना, पुण्याहवचन, पवमान, अभिषेक झाला. सायंकाळी सहाला श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथून सुदर्शन दिग्विजय रथयात्रेस प्रारंभ झाला. पारंपरिक मार्गाने रथयात्रा ‘व्यंकटरमणा गोविंदा’च्या गजरात मार्गस्थ झाली.

बालाजी मंदिर, भांडी बाजार, गंगा पटांगण, दिल्ली दरवाजा, गुलालवाडी व्यायामशाळा, मधली होळी, बुधवार टेक, जुनी तांबट आळी, भद्रकाली मंदिर, हुंडींवाला लेन, पगडबंद गल्ली, सराफ बाजार, कापड पेठ येथून मिरवणूक (Procession) जाऊन बालाजी मंदिर येथे समारोप झाला. रथाचे मानकरी श्री व्यंकटेश बालाजी मंंदिराचे महंत पूजाधिकारी डॉ. रमेश बालाजीवाले (Shri Venkatesh Balaji Mandira Mahant Pujadhikari Dr. Ramesh Balajiwale) होते.

श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे विश्वस्त प्रमोद पुराणिक (Pramod Puranik, Trustee of Shri Venkatesh Balaji Devasthan), मिलिंद मोडक, वसंत खैरनार, अ‍ॅड. सतीश मुजुमदार, अ‍ॅड. हर्षवर्धन बालाजीवाले, विक्रम बालाजीवाले, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालीजीवाले (Deshdoot Executive Editor Dr. Vaishali Balijiwale), धु्रव बालाजीवाले, राजेश नाशिककर व बालाजीवाले परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत रथ मार्गस्थ झाला. गोसावी, देशपांडे, मूर्ती, जांंदे, गरबे, केळकर आदींसह भाविकानी रथयात्रा यशस्वी केली. ऱथाचे चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भाविकांनी श्रींच्या दर्शनानंंतरच उपवास सोडला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

रोज रात्री 8 ला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम (cultural programs) होणार आहे. मंंगळवारी (दि. 27) नाशिकमधील (nashik) उदयोन्मुख कलाकार युवरंंग सादर करणार आहे. बुधवारी (दि. 28) नादकीस्तुभम हा कर्नाटकी संगीतकारांचा कार्यक्रम मुंबईचे शंकरनारायण व त्यांचे सहकारी सादर करणार आहे . गुरुवारी (दि. 29) पुण्याच्या सृष्टी चितळे – लेले ह्या भारतनाट्यम सादर करणार आहे. एक ऑक्टोबरला मंजिरी असणारे – केळकर यांचे गायन होईल.

त्यांना नितीन वारे, (तबला), ज्ञानेश्वर सोनवणे ( हार्मोनियम,) देवश्री नवघरे (तानपुरा) साथ देणार आहे. 3 ऑक्टोबरला अनहद हा संस्कृत श्लोक, स्तोत्र, भजन, ओव्यांचा अनोखा संगीतमय फ्यूजन अविष्कार सादर होणार आहे. त्यात अगम अग्रवाल, चेतन प्रजापती, संंस्कार जानोरकर, अथर्व वारे, अमित भालेराव आदी कलावंत सहभागी होेणार आहे. 4 ऑक्टोबरला सायंकाळी 5 ला ग्यानानंद नामसंंकीर्तन मंडळ भजन सादर करतील. 8 ऑक्टोबरला डॉ. प्राची जावडेकर यांचे कथाकथन होईल. 9 ऑक्टोबरला गरबा नृत्याने समारोप होणार आहे.

येत्या रविवारी (दि. 2) श्रींचा विवाह समारंभ सायंकाळी 7 ला होईल. 5 ऑक्टोेंबरला विजयदशमीदिनी पवमान अभिषेक सकाळी 10 ला केला जाईल. 6 ऑक्टोबरला सायंकाळी सातला श्रींचे अवधूत स्नान, पवमान अभिषेक केला जाईल. येत्या कोजागिरी पौणिमेपर्यंंत मदिर परिसर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ेगजबजून जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या