Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट, असे आहे नवे दर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट, असे आहे नवे दर

नवी दिल्ली | New Delhi

महागाईमुळे (inflation) आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinders) दरात बदल होत असतात. त्यामुळे आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला असून हे नवे दर महिनाभरासाठी लागू असणार आहेत…

- Advertisement -

या अगोदर १ मे २०२३ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial Gas Cylinders) किंमत १७२ रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्यानंतर आता गॅसची किंमत ८३.५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नसून घरगुती गॅस सिलिंडरचा दर ११०३ रुपयांवर कायम आहे.

“मी भाजपची पण भाजप माझी…”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान

तसेच नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत ८३.५ रुपयांनी कमी झाली असून आता १ हजार ७७३ रुपयांवर पोहोचली आहे. तर कोलकातामध्ये सिलिंडर ८५ रुपयांनी स्वस्त झाला असून तो आता १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांवर आला आहे. याशिवाय मुंबईमध्ये (Mumbai) गॅस सिलिंडरची किंमत १८०८.५ रुपयांवरून १७२५ रुपयांवर ८३.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किंमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली असून किंमतीत सुमारे सहा हजार ६०० रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर (Air Travel) होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या